गर्भधारणा: १४वा आठवडा

0
68

गर्भधारणा: १४वा आठवडा

On this Article

 • गर्भारपणाच्या १४व्या आठवड्यातील तुमचे बाळ
 • बाळाचा आकार केवढा असतो?
 • शरीरात होणारे बदल
 • १४व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
 • गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात पोटाचा आकार
 • गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यातील सोनोग्राफी
 • आहार कसा असावा?
 • काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
 • कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

गर्भधारणेचा १४ वा आठवडा हा तुमच्या गरोदरपणातील नवीन टप्पा आहे. पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण करून तुम्ही दुसऱ्या तिमाही मध्ये पदार्पण केले आहे. सगळं अगदी व्यवस्थित होत आहे आणि आता बऱ्याच लोकांना लक्षात येण्याइतपत तुमच्या पोटाचा आकार वाढला आहे.

तथापि, जरी तुम्ही गरोदर आहात असे वाटण्याइतपत तुमचं पोट दिसत नसेल तरीही काळजी करण्याचे काहीच कारण नाही मैत्रिणींनो. कारण येणारे पुढचे काही आठवडे तितकेच रोमांचक आहेत आणि  तुमच्या बाळाचा विकास वेगाने होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमच्या शरीरात थोडे बदल होणार आहेत आणि त्यातील महत्वाचा बदल म्हणजे ‘ओटीपोटावरील उंचवटा’’!

गर्भारपणाच्या १४व्या आठवड्यातील तुमचे बाळ

१४व्या आठवड्यात  तुमच्या बाळाने यशस्वीरीत्या संक्रमण केले आहे आणि तुमच्या पोटातील बाळ चेहऱ्यावरचे हावभाव बदलते. आता तुमचे बाळ घट्ट वळलेल्या मुठीएवढे असते आणि पूर्णवेळ हालचाल करत असते.

तुम्हाला दिसत नसते किंवा तुम्हाला अनुभवता येत नसते, पण तुमचे बाळ चेहरा वेडावाकडा करते, एक डोळा हळूच उघडून पहाते आणि कधी कधी एक भुवई उंचावते. तुमच्या बाळाची मूत्रपिंडे कार्यरत झालेली असून लघवीची निर्मिती होते आणि ती गर्भजलामध्ये मिसळते आणि बाळ ते पिते. बाळाच्या मानेची लांबी वाढलेली आहे आणि बाळ खरोखरीच बाहेरील कुठल्याही प्रोत्साहनाशिवाय उभे राहते. तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके स्पष्ट होतात आणि तुमच्या डॉक्टरांना किंवा तज्ञांना ते ऐकता येऊ शकतात.

बाळाचा आकार केवढा असतो?

ह्या आठवड्यात तुम्ही तुमच्या बाळाच्या आकाराची तुलना किवी, पीच किंवा लिंबाशी करू शकता. ह्या छोट्या पीचचे वजन तुमच्या पोटात ५०-६० ग्रॅम्स इतके असते. तुमच्या बाळाची लांबी साधारणपणे ३-४ इंच इतकी असते. जरी गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यातील बाळाचा हा आकार अनपेक्षित असला तरीसुद्धा हे किवीच्या आकाराएवढे बाळ तुमच्या शरीरामध्ये बदल घडवते आणि गर्भधारणेच्या लक्षणांमध्ये सुद्धा ते सहभागी असते.

शरीरात होणारे बदल

वर म्हटल्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही वेगवेगळे बदल अनुभवता आणि तुमच्या वेगाने वाढणाऱ्या बाळाचा गर्भधारणेदरम्यानच्या ह्या बदलांमध्ये सहभाग असतो.

तुमची दुसरी तिमाही, पहिल्या तिमाहीपेक्षा सुलभ असते. बऱ्याच स्त्रियांना थकवा कमी जाणवतो तसेच  मॉर्निंग सिकनेस सुद्धा खूप कमी झालेला असतो. सामान्यपणे तुम्हाला छान आणि उत्साही वाटते. तुम्ही वजनावर लक्ष ठेऊ शकता. १-२ किलो वजन वाढणे ठीक आहे पण वजन कमी होणे म्हणजे चिंताजनक आहे.

अर्थात, १४ व्या आठवड्याचा सर्वात रोमांचकारी गोष्ट म्हणजे तुमचे पोट थोडे दिसू लागेल तसेच गर्भपाताची शक्यता कमी झालेली असेल त्यामुळे तुम्ही ही गोड़ आणि मोठी बातमी जाहीर करू शकता.

१४व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

प्रत्येक आठवड्यात गर्भधारणेचे नवीन लक्षण दिसते. मागच्या आठवड्यातील काही लक्षणे पुनःपुन्हा दिसतात आणि ती तुमच्या गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात आणि पुढेही दिसतात. त्यापैकी काही लक्षणे पुढीलप्रमाणे:

 • अस्थिबंध वेदना (Ligament ache )
 • दाट आणि चमकदार केस
 • उत्साह आणि ऊर्जेमध्ये वाढ
 • भूक जास्त लागणे
 • मनःस्थितीत बदल
 • स्तनांमध्ये कमी वेदना
 • मळमळ
 • वजनात लक्षणीय वाढ
 • पोटात दुखणे
 • वेरिकोस व्हेन्स किंवा पाय आणि पावलांमधील वाहिन्या विस्तारित होणे
 • नाक चोंदणे

गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भधारणा: १४वा आठवडा

तुमच्यापैकी बऱ्याच जणींच्या पोटावर आता उंचवटा दिसू लागेल. तुमचे पोट थोडे दुखेल तसेच पोटाला खाज सुद्धा सुटेल, म्हणजेच तुमचे शरीर तुमच्या वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे.

तुम्हाला थोडे वजन वाढवण्याचा सल्ला दिला जातो परंतु निरोगी राहण्यासाठी तुम्ही व्यायाम करत आहात ह्याची खात्री करा तसेच शरीराचे दुखणे जे आता हळू हळू तुम्हाला जाणवू लागले आहे ते हाताळण्याचा प्रयत्न करा.

गर्भधारणेच्या १४व्या आठवड्यातील सोनोग्राफी

१४व्या आठवड्यात सोनोग्राफी  करणे फार दुर्मिळ आहे, परंतु तुम्ही केली असेल तर तुम्हाला एक खूप गोङ सरप्राईझ मिळणार आहे. तुमच्या बाळाने अंगठा तोंडात घालायला सुरुवात केलेली आहे आणि ते बघून तुम्ही तुमच्या बाळाच्या प्रेमात पुनः पुन्हा पडणार आहात!

नीट बघितल्यावर लक्षात येईल की तुमचे बाळ पायांच्या बोटांची वळवळ सुद्धा करीत आहे. बाळाचे यकृत आणि प्लिहा कार्यरत आहेत आणि बाळाची मूत्रपिंडे सुद्धा कार्यरत झालेली असून लघवीची निर्मिती होत आहे. तुमच्या बाळाभोवती केसांचे एक सुरक्षित आवरण सुद्धा दिसेल, त्यामुळे बाळाला उबदार राहण्यास मदत होईल.

आहार कसा असावा?

गर्भधारणेच्या १४ व्या आठवड्यादरम्यान खाद्यपदार्थांची निवड आपल्या आणि आपल्या बाळाला आवश्यक विविध आणि पोषक तत्त्वांनीयुक्त असली पाहिजे. किंबहुना तुमच्या गर्भाधारणेच्या संपूर्ण काळात तुम्ही इंद्रधनूच्या रंगांसारखे विविधरंगी अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत.

उदा: बीटरूट, हिरव्या पालेभाज्या, प्रथिने आणि कॅल्शिअमने समृद्ध असलेले अन्नपदार्थ

गर्भावस्थेदरम्यानच्या नेहमी आढळणारा गैरसमज म्हणजे तुम्हाला जास्त खाण्याची गरज आहे कारण बाळाला तुमच्यापासून पोषण मिळणार आहे. परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. हे गोंधळून टाकणारे जरी असले तरी तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी एक योग्य आहार तक्ता तयार करतील ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला योग्य पोषण मिळणार आहे जेणेकरून गरजेपेक्षा जास्त आहार घेतला जाणार नाही.

दरम्यानच्या काळात जर तुम्हाला काही खावेसे वाटले तर फळे जवळ ठेवा. तुम्ही भरपूर सुकामेवा आणि दही  आणून ठेवा. गर्भावस्थेदरम्यान पोषक आहाराची निवड करणे शहाणपणाचे ठरेल. फॉलिक ऍसिड ने समृद्ध अन्नपदार्थ घ्या त्यामुळे जन्मतः उद्भवणाऱ्या समस्यांची शक्यता कमी होईल. ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स असलेले चरबीयुक्त मासे खाण्यास विसरू नका. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आहाराचा एक भाग असला पाहिजे कारण त्यामुळे तुमची हाडे बळकट होणार आहेत.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

थोड्यात सांगायचे झाले तर, तुमच्या संपूर्ण गर्भधारणेच्या काळात तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बाळाला सुरक्षित आणि निरोगी ठेवले पाहिजे. तुम्ही गर्भारपणाच्या पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात.

आम्ही खाली काही गोष्टी दिल्या आहेत त्या फक्त १४व्या आठवड्यासाठी नव्हे तर तुमच्या संपूर्ण गर्भावस्थेत उपयोगी पडणार आहेत.

हे करा

 • भरपूर विश्रांती घ्या आणि नियमित काही तास झोपा.
 • शरीराला आरामदायक वाटतील अशा काही उशा आणा.
 • सकारात्मक विचार करा आणि उत्साही रहा.
 • पालकत्वाची काही पुस्तके वाचा.
 • शारीरिक संबंध ठेवा.
 • तुमच्या तोंडाची काळजी घ्या.
 • तुमच्या वैयक्तिक स्वछतेची काळजी घ्या.
 • चांगले शिजवलेले अन्नपदार्थ खा.
 • व्यायाम आणि योग करा.

हे करू नका

 • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
 • तुम्हाला ताण येईल अशा परिस्थितीत राहू नका.
 • खूप काळजी करू नका.
 • खूप जास्त व्यायाम करू नका.
 • खूप जास्त किरणोत्सर्गाला सामोरे जाऊ नका.
 • अस्वच्छ ठिकाणी जाऊ नका.
 • उपाशी राहू नका.
 • डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्यास विसरू नका.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमच्या गर्भारपणाच्या ह्या अवस्थेत तुम्हाला आरामात राहणे गरजेचे आहे. सैलसर कॉटनचे कपडे घ्या ज्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल. थोडे स्टायलिश मॅटर्निटी कपडे आणा जे तुम्हाला नंतर सुद्धा वापरता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे मऊ आणि सपाट शूज किंवा चपला आणा आणि तुमचे फॅन्सी शूज तूर्तास बाजूला ठेवा. तुमची त्वचा कोरडी पडणार आहे त्यामुळे लोशन्स किंवा मॉइश्चराझर्स आणून ठेवा. चांगल्या आणि ताणल्या जातील अशा ब्रा खरेदी करा कारण लवकरच तुमच्या स्तनांचा आकार वाढणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नर्सिंग ब्रा सुद्धा विकत घेऊ शकता, कारण तुम्हाला त्या लवकरच लागणार आहेत.

गर्भारपणाविषयी जितके शक्य होईल तितके वाचन करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाचे स्वागत करण्यास तयार राहू शकता, तसेच त्यामुळे ह्या कालावधीत येणारा ताण सुद्धा कमी होण्यास मदत होईल.

Supply: Web

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here